दासरी-माला दासरी समाजातील कु. प्रांजली यंगलवारची एमबीबीएससाठी निवड

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अमरावती येथे प्रवेश निश्चित; यंगलवार कुटुंबाच्या कष्टाचे फलित

हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| शहरातील रहिवासी कु. प्रांजली मनोजकुमार यंगलवार हिची एमबीबीएस या प्रतिष्ठित वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी निवड झाली असून, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अमरावती येथे तिचा प्रवेश निश्चित झाला आहे. प्रांजलीच्या या उल्लेखनीय यशामुळे हिमायतनगर शहरासह दासरी-माला दासरी समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्रांजलीने आपल्या शैक्षणिक प्रवासात सातत्य, कठोर परिश्रम आणि जिद्द कायम ठेवत वैद्यकीय शिक्षणाचे स्वप्न साकार केले. नांदेड येथे शिक्षण घेत असताना तिच्या आई-वडिलांनी मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी आर्थिक व कौटुंबिक अडचणींवर मात करत शिक्षणाची जबाबदारी समर्थपणे पार पाडली. त्यांच्या कष्टाला आणि प्रांजलीच्या मेहनतीला मिळालेले हे यश असल्याची भावना व्यक्त होत आहे.

एमबीबीएससारख्या प्रतिष्ठित अभ्यासक्रमात प्रवेश मिळवून कु. प्रांजली मनोजकुमार यंगलवार हिने आपल्या आई-वडिलांसह आजी-आजोबा, कुटुंबीय आणि दासरी-माला दासरी समाजाचे नाव उज्ज्वल केले आहे. तिच्या यशामुळे समाजातील विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला आहे.

प्रांजलीच्या या यशाबद्दल नातेवाईक, मित्रपरिवार, शिक्षक तसेच समाजातील विविध स्तरांतून तिचे अभिनंदन करण्यात येत आहे. भविष्यात एक यशस्वी व सेवाभावी डॉक्टर म्हणून समाजाची सेवा करण्यासाठी तिला शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!