नांदेडमध्ये गांजा तस्करीवर पोलिसांचा मोठा घाव

नांदेड | नांदेड जिल्ह्यात अमली पदार्थांविरोधात पोलिसांनी पुन्हा एकदा मोठी कारवाई करत गांजा तस्करीचे रॅकेट उधळून लावले आहे. नांदेड पोलीस (Nanded Police) यांच्या या धडक कारवाईत सुमारे ₹६,७५,५०० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, दोघा आरोपींना अटक करण्यात आली आहे.

अर्धापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी आरोपींकडून तब्बल २८ किलो १५० ग्रॅम गांजा जप्त केला. जप्त केलेल्या गांजाची किंमत सुमारे ₹२,२५,५०० इतकी असून, यासोबतच स्विफ्ट डिझायर कार ४, ५०, ००० असा एकूण ₹६,७५,५०० चा माल हस्तगत करण्यात आला आहे.

या प्रकरणी रवी बाबुराव वाघे (रा. भोक्कर) आणि एक अन्य आरोपी यांना अटक करण्यात आली असून, फरार आरोपीचा शोध सुरू आहे. आरोपींविरुद्ध NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार (Avinash Kumar) यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखा व अर्धापूर पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही यशस्वी मोहीम पार पाडली.

दरम्यान, या कारवाईमुळे नांदेड जिल्ह्यातील अमली पदार्थांच्या तस्करीवर मोठा आळा बसणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. अवैध धंद्यांविरोधात पुढेही अशीच कडक कारवाई सुरू राहणार असल्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!