बसमध्ये सापडलेला महागडा टॅब पोलिसांकडे सुपूर्द; वझरग्याच्या पांडुरंग सूर्यवंशीचा प्रामाणिकपणा चर्चेत
देगलूर, गंगाधर मठवाले| बस प्रवासादरम्यान सापडलेला महागडा टॅब स्वतःकडे न ठेवता तो पोलिसांकडे सुपूर्द करून इयत्ता दहावीतील विद्यार्थी पांडुरंग वसंत सूर्यवंशी याने प्रामाणिकपणाचा आदर्श घालून दिला आहे. त्याच्या या कृतीचे पोलीस प्रशासनासह देगलूर तालुक्यात कौतुक होत आहे.
पांडुरंग सूर्यवंशी हा वझरगा येथील रहिवासी असून, देगलूर येथील मानव्य विकास विद्यालयात इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेत आहे. सोमवार, दि. ५ ऑक्टोबर रोजी शाळा सुटल्यानंतर तो बसने वझरगा येथे घरी परतत होता. प्रवासादरम्यान बसच्या सीटवर एक महागडा टॅब बेवारस अवस्थेत पडलेला त्याच्या निदर्शनास आला. टॅब सापडल्यानंतर तो स्वतःकडे ठेवण्याऐवजी मूळ मालकापर्यंत पोहोचविण्याचा निर्णय पांडुरंगने घेतला. घरी पोहोचल्यानंतर त्याने याबाबत कुटुंबीयांना माहिती दिली.
त्यानंतर मंगळवारी सकाळी पांडुरंगने वडील वसंत सूर्यवंशी यांच्यासोबत उपविभागीय पोलीस अधिकार...
