राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये 1680 प्रकरणे निकाली : 7 कोटी 68 लाख रुपयांची तडजोड
नांदेड| महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या आदेशान्वये तसेच प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष नरेंद्र के. ब्रह्ये यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार, दि. 9 मे 2026 रोजी नांदेड जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते.
या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, दिवाणी व फौजदारी तडजोड पात्र प्रकरणे, कौटुंबिक वाद, एन.आय. अॅक्ट प्रकरणे, नांदेड वाघाळा महानगरपालिका मालमत्ता कर प्रकरणे, गुन्हा कबुली प्रकरणे, आरटीओ व रेल्वे पोलीस विभागाची प्रकरणे, कामगार न्यायालय, सहकार न्यायालय, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बँक व फायनान्स कंपनी प्रकरणे, पंचायत समिती कर वसुली, बीएसएनएल व एमएसईडीसीएल कंपनीची प्रकरणे आदी विविध प्रकारच्या प्रकरणांचा समावेश करण्यात आला होता. यासाठी जिल्ह्यात एकूण 30 पॅनल तयार करण्य...
