Tag: 30 जूनपासून

30 जूनपासून मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण; प्रत्येक पात्र मतदाराने EF फॉर्म भरण्याचे आवाहन

30 जूनपासून मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण; प्रत्येक पात्र मतदाराने EF फॉर्म भरण्याचे आवाहन

राजकारण
बिलोली, गोविंद मुंडकर| भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादी अचूक, अद्ययावत आणि पारदर्शक करण्यासाठी 30 जून ते 29 जुलै 2026 या कालावधीत विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision - SIR) अभियान राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत प्रत्येक पात्र मतदाराने सक्रिय सहभाग घेऊन Enumeration Form (EF) वेळेत भरून द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या अभियानाअंतर्गत बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) घराघरात जाऊन मतदारांकडून EF फॉर्म भरून घेणार आहेत. प्रत्येक मतदाराने दोन पासपोर्ट आकाराचे फोटो तयार ठेवावेत. फॉर्मवर संबंधित मतदाराने किंवा कुटुंबातील प्रौढ सदस्याने स्वाक्षरी अथवा अंगठ्याचा ठसा देणे आवश्यक राहील. फॉर्मची एक प्रत मतदाराकडे राहणार असून दुसरी प्रत BLO यांच्याकडे जमा केली जाईल. 40 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या मतदारांनी सन 2002 च्या मतदार यादीतील स्वतःचा भाग क्रमांक व अनुक्रमांक सांगावा. त...
error: Content is protected !!