100 दिवस कृती आराखड्यांतर्गत नांदेड मनपाकडून पावसाळापूर्व नालेसफाईला वेग
नांदेड| नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या सेवा-सुविधांमध्ये संख्यात्मक व गुणात्मक सुधारणा करण्याच्या उद्देशाने महापौर सौ. कविता मुळे, उपमहापौर दिपकसिंह रावत आणि सभागृह नेते ॲड. महेश कानकदंडे यांच्या अध्यक्षतेखाली ‘100 दिवस कृती आराखडा’ उपक्रम राबविण्यात येत आहे.
या उपक्रमाअंतर्गत आपत्ती सौम्यीकरणासाठी स्वच्छता विभागामार्फत पावसाळापूर्व तयारीला वेग देण्यात आला असून, शहरातील छोटे व मोठे नाले जेसीबी व पोकलेन मशिनच्या सहाय्याने साफ करण्यात येत आहेत.
आयुक्त महेशकुमार डोईफोडे, उपआयुक्त नितीन गाढवे (स्वच्छता) आणि सहाय्यक आयुक्त गुलाम सादिक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक 02, 05, 08, 09, 13, 17 व 20 मधील पावसाळ्यात पाणी साचणारे व वाहणारे नाले स्वच्छ करण्याचे काम सुरू आहे.
मागील दोन आठवड्यांपासून कच्चे व पक्के नाले यांची व्यापक स्वरूपात साफसफाई केली जात असून, संबंधित अधिकाऱ्यांकडून...
