हिमायतनगरातील स्विमिंग पूलमध्ये बुडून ९ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
निष्काळजीपणाचा आरोप; परिसरात हळहळ व्यक्त
नांदेड/हिमायतनगर | हिमायतनगर शहरातील एका स्विमिंग पूलमध्ये बुडून ९ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली असून, संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली आहे. सक्षम गायकवाड असे मृत मुलाचे नाव असून तो इयत्ता तिसरीत शिक्षण घेत होता.
मिळालेल्या माहितीनुसार, सक्षम नागराज गायकवाड हा किनवट तालुक्यातील इस्लापूर सर्कलमधील भिसी गावचा रहिवासी होता. तो आपल्या आईसोबत मामाच्या गावी लग्नसमारंभ साठी हिमायतनगर येथे आला होता. दरम्यान, स्विमिंग पूलमध्ये पोहण्याचा हट्ट केल्याने आई त्याला घेऊन गेली होती. मात्र पोहत असताना पाण्यात बुडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच चिमुकल्याच्या आईने रुग्णालयात धाय मोकलून आक्रोश केला. “पोटचा गोळा” गमावल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, ही घटना पाहून उपस्थितांच्याही डोळ्यांत अश्रू आले. दरम्यान, ...
