Tag: ८७ ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले

हिमायतनगर SBI चा मनमानी कारभार? ८७ ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले; संतापाची लाट

हिमायतनगर SBI चा मनमानी कारभार? ८७ ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले; संतापाची लाट

महाराष्ट्र
पंचायत समितीकडून धनादेश वेळेत दिल्याचा दावा; बँकेच्या हलगर्जीपणाचा आरोप, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट, उपासमारीची वेळ.!  हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर तालुक्यातील तब्बल ८७ ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन रखडल्याने भारतीय स्टेट बँकेच्या (SBI) स्थानिक शाखेच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पंचायत समितीकडून वेतनाचा धनादेश वेळेत जमा करूनही अनेक दिवस उलटून गेले, तरी कर्मचाऱ्यांच्या खात्यात पगार जमा न झाल्याने संतापाची लाट उसळली आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पंचायत समितीने दिनांक २४ जून रोजी सुमारे ७ लाख ६९ हजार रुपयांचा धनादेश बँकेत जमा केला. मात्र, अनेक दिवस उलटूनही वेतन खात्यात न आल्याने कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. घरखर्च, कर्जाचे हप्ते आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च यामुळे अनेक कर्मचाऱ्यांची कोंडी झाली आहे. याप्र...
error: Content is protected !!