Tag: ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त

एसटी महामंडळाच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त नांदेड आगारात १०० वृक्षांचे वृक्षारोपण

एसटी महामंडळाच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त नांदेड आगारात १०० वृक्षांचे वृक्षारोपण

सामाजिक
नांदेड | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त नांदेड आगारात मंगळवारी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा भव्य वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमाला परिवहन विभागाचे अधिकारी, कर्मचारी, माध्यम प्रतिनिधी, प्रवासी आणि प्रवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार तथा सीमावर्ती भागाचे प्रमुख समन्वयक गोविंद मुंडकर यांनी वृक्ष लागवडीसोबतच त्यांच्या संगोपनाचे महत्त्व अधोरेखित केले. "वृक्षारोपण ही काळाची गरज असली तरी वृक्षांचे संगोपन होऊन त्यांचा वाढदिवस साजरा करण्याची वेळ आली, तरच या उपक्रमाला खऱ्या अर्थाने यश मिळेल," असे त्यांनी सांगितले. ज्येष्ठ पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते डॉ. शिवदास हमंद यांनीही पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षांचे महत्त्व विशद केले. कार्यक्रमाला परिवहन अधिकारी चिन्मय चिटणीस, आगारप्रमुख दिग्...
error: Content is protected !!