Tag: ५.०४ लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड विमानतळ हद्दीत घरफोडी करणारे आरोपी जेरबंद; ५.०४ लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड विमानतळ हद्दीत घरफोडी करणारे आरोपी जेरबंद; ५.०४ लाखांचा मुद्देमाल जप्त

क्राइम
नांदेड (प्रतिनिधी) विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश करत दोन आरोपींना अटक केली असून एक आरोपी फरार आहे. आरोपींकडून सुमारे ५ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा क्रमांक १७१/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५(अ), ३३१(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक मिलींद सोनकांबळे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील (भोकर) व अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे शेख नईम शेख महेबुब (वय २२, रा. माळटेकडी, म्हाळजा, नांदेड) व शेख रहेमान उर्फ भेंडी शेख अशपाक (वय १९, रा. मखदुम नगर, नई आबादी, नांदेड) अशी ...
error: Content is protected !!