Tag: ४–५ दिवसांतच सकाळ सत्र सुरू

40° तापमानात दिव्यांग विद्यार्थ्यांशी खेळ? आदेश धाब्यावर; शेवटच्या ४–५ दिवसांतच सकाळ सत्र सुरू

40° तापमानात दिव्यांग विद्यार्थ्यांशी खेळ? आदेश धाब्यावर; शेवटच्या ४–५ दिवसांतच सकाळ सत्र सुरू

करियर
नांदेड | जिल्ह्यात कडक उन्हाचा तडाखा असताना दिव्यांग विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दि. 05 मार्च 2026 रोजी शाळा सकाळच्या सत्रात घेण्याचा स्पष्ट आदेश असतानाही काही दिव्यांग शाळांनी तब्बल दीड महिना त्याची अंमलबजावणी न केल्याचे उघड झाले आहे. परिणामी 40 अंशांपेक्षा जास्त तापमानात विद्यार्थ्यांना दुपारच्या सत्रात शिक्षण घ्यावे लागले. नांदेडमधील मालपाणी मूकबधिर विद्यालय, मगनपुरा येथे दीर्घकाळ शाळा दुपारच्या सत्रातच सुरू ठेवण्यात आल्याची बाब समोर आली आहे. यामुळे वस्तीगृहातील तसेच ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली. विशेष म्हणजे शिक्षक व कर्मचारी वर्गालाही तीव्र उष्णतेचा सामना करावा लागला. दरम्यान, सकाळ सत्र सुरू करण्यासाठी शिक्षक व कर्मचाऱ्यांनी मुख्याध्यापकांकडे विनंती केली असता, त्यांना अपमानास्पद वागणू...
error: Content is protected !!