Tag: ३१ जुलैपर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत

नांदेड जिल्ह्यातील वयोवृद्ध कलावंतांनी ३१ जुलैपर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत; मीरा जाधव पाटील यांचे आवाहन

नांदेड जिल्ह्यातील वयोवृद्ध कलावंतांनी ३१ जुलैपर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत; मीरा जाधव पाटील यांचे आवाहन

सामाजिक
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| राज्य शासनाच्या 'राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन योजना २०२६-२७' अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील वयोवृद्ध ज्येष्ठ कलावंत, शाहीर आणि लोकपारंपरिक कलाकारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक व पात्र लाभार्थ्यांनी १ जुलै ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत 'आपले सरकार' पोर्टलवर अर्ज करावेत, असे आवाहन मानधन निवड समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि समितीचे सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत विभाग) डी. बी. गिरी यांनी केले आहे. या योजनेसाठी अर्जदाराचे वय ५० वर्षांपेक्षा अधिक असणे आवश्यक असून दिव्यांग कलाकारांसाठी ४० वर्षे वयोमर्यादा आहे. अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न सर्व स्रोतांमधून ६० हजार रुपयांपर्यंत असावे. तसेच अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे बंधनकारक आहे. अर्जासोबत वयाचा दाखला, आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, रहिवा...
error: Content is protected !!