२७ वी रत्नेश्वरी पाऊस दिंडी रविवारी; पर्यावरण संवर्धनासह अमरनाथ यात्रेच्या यशासाठी प्रार्थना
नांदेड | मराठवाड्यात यंदा भरपूर पाऊस पडावा, जलसाठे भरावेत, पर्यावरणाचे संवर्धन व्हावे तसेच अमरनाथ यात्रा निर्विघ्न व यशस्वी पार पडावी, या उद्देशाने धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली २७ वी रत्नेश्वरी पाऊस दिंडी रविवारी (दि. २८ जून) सकाळी ६ वाजता जी. जी. रोडवरील बालाजी मंदिर येथून उत्साहात प्रस्थान करणार आहे.
अमरनाथ यात्री संघ, भारतीय जनता पार्टी नांदेड महानगर आणि लायन्स क्लब नांदेड सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने या दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमासाठी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार अमरनाथ राजूरकर, संजय कोडगे, ॲड. चैतन्य देशमुख, डी. पी. सावंत, डॉ. संतुकराव हंबर्डे, ॲड. किशोर देशमुख, महापौर कविता मुळे, उपमहापौर दीपकसिंह रावत, स्थायी समिती सभापती विरेंद्रसिंह गाडीवाले, सभागृह नेते ॲड. महेश कनकदंडे तसेच इतर मान्यवरांचे मार्गद...
