Tag: २७ मुलींना लाभ

नांदेडमध्ये मोफत एचपीव्ही लसीकरण शिबिर; २७ मुलींना लाभ

नांदेडमध्ये मोफत एचपीव्ही लसीकरण शिबिर; २७ मुलींना लाभ

आरोग्य
नांदेड| मुलींमध्ये होणाऱ्या गर्भाशयाच्या कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी आयोजित करण्यात आलेल्या मोफत एचपीव्ही लसीकरण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर आणि महिला मोर्चा प्रदेश चिटणीस सुमती व्याहाळकर यांच्या पुढाकारातून हे शिबिर पार पडले. शिवशक्तीनगर येथे आयोजित या शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. रमेश माने यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. रमेश नारलावार होते, तर शीतल खांडील यांची प्रमुख उपस्थिती होती. या उपक्रमांतर्गत १४ ते १५ वर्षे वयोगटातील २७ मुलींना सुमारे ₹४५०० किंमतीची एचपीव्ही लस पूर्णपणे मोफत देण्यात आली. भाजप नांदेड महानगर, लायन्स क्लब नांदेड सेंट्रल, अमरनाथ यात्रेकरू संघ आणि मनपा नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. या उपक्रमाला विविध मान्यवरांचे मार्गदर्शन लाभ...
error: Content is protected !!