नांदेडमध्ये १ लाख बांबू लागवड मोहिमेला प्रारंभ; जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या हस्ते शुभारंभ
३७.५० लाख वृक्षलागवडीच्या उद्दिष्टपूर्तीसाठी जलसंधारण आणि पर्यावरण संवर्धनाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम
नांदेड | पर्यावरण संवर्धन, जलसंधारण आणि हरित नांदेडच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकत मृद व जलसंधारण विभागाच्या १ लाख बांबू लागवड मोहिमेचा शुभारंभ आज मौजे सालेगाव (ता. धर्माबाद) येथे जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या हस्ते करण्यात आला.
यंदाच्या पावसाळी हंगामात नांदेड जिल्ह्यासाठी ३७ लाख ५० हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून, त्याअंतर्गत मृद व जलसंधारण विभागाला १ लाख बांबू लागवडीचे विशेष उद्दिष्ट देण्यात आले आहे. पूर्ण झालेल्या नाला खोलीकरण व इतर जलसंधारण कामांच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर बांबू लागवड करून पर्यावरण संवर्धनाला चालना देण्याचा हा महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे.
यावेळी उपविभागीय अधिकारी राऊत, तहसीलदार श्रीमती स्वामी, जिल्हा जलसंधारण अधिकारी श्री. कांबळे, उपवि...
