Tag: १५ दिवसीय संघ शिक्षा वर्ग सुरू होणार

जामनेर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा १५ दिवसीय संघ शिक्षा वर्ग सुरू होणार

जामनेर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा १५ दिवसीय संघ शिक्षा वर्ग सुरू होणार

महाराष्ट्र
शारीरिक, बौद्धिक, संघटनात्मक आणि सेवाकार्याचे मिळणार प्रशिक्षण छत्रपती संभाजीनगर/जामनेर | राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देवगिरी प्रांताचा (मराठवाडा व खान्देश) १५ दिवसीय संघ शिक्षा वर्ग यावर्षी जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे आयोजित करण्यात आला आहे. ललवाणी महाविद्यालयाच्या परिसरात दि. १६ मे ते ३० मे २०२६ या कालावधीत हा निवासी वर्ग संपन्न होणार असून, देवगिरी प्रांतातील अकरा जिल्ह्यांमधून १२० स्वयंसेवक शिक्षार्थी यात सहभागी होणार आहेत. स्वयंसेवकांच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने दरवर्षी संघ शिक्षा वर्गांचे आयोजन केले जाते. यावर्षी जामनेर येथे होणाऱ्या या वर्गात स्वयंसेवकांना शारीरिक, बौद्धिक, संघटनात्मक, व्यवस्थापकीय तसेच सेवाकार्याचे सखोल प्रशिक्षण दिले जाणार आहे. कठोर शिस्त आणि सर्वांगीण प्रशिक्षण १५ दिवसांच्या या निवासी वर्गात पहाटे ४.३० वाजता दिवसाची सुरुवात हो...
error: Content is protected !!