नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; १३.४० लाखांचा गांजा जप्त, १७ जणांविरुद्ध गुन्हा
नांदेड (प्रतिनिधी) नांदेड ग्रामीण पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान तेलंगणातून महाराष्ट्रात येणाऱ्या अवैध गांज्याच्या तस्करीवर मोठी कारवाई करत १३ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून १७ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात गु.र.नं. 433/2026 अंतर्गत एनडीपीएस कायदा १९८५ (कलम 20(B), 22(B), 25) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई चंदनसिंग कॉर्नर येथे २२ एप्रिल रोजी पहाटे २.१० वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.
पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील व सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली.
नाकाबंदी दरम्यान देगलूरकडून नांदेडकडे येणारी एक संशयित Maruti Dzire कार (TS09UC-6085) थांबवून तपासणी केली असता डिकीत २२ किलो वजनाचा गांजा आढळून आला. पोलिसांनी सुमारे ४.४० लाख रुपये किंमतीचा गांजा व ९ लाख रुपये किंमतीची कार असा एकूण १३.४० लाखां...
