अमृत भारत योजनेतील कोट्यवधींच्या खर्चानंतरही हिमायतनगर रेल्वे स्थानक प्रवाशांच्या सुविधांपासून वंचित?
हिमायतनगर,उत्कर्ष मादसवार| अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत कोट्यवधी रुपयांचा खर्च करून हिमायतनगर रेल्वे स्थानकाचे सुशोभीकरण करण्यात आले असले, तरी आजही अनेक मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. केवळ रंगरंगोटी करून विकासाचा देखावा उभा करण्यात आला असून, प्रत्यक्षात प्रवाशांच्या दैनंदिन अडचणी मात्र कायम असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
स्थानकावरील वेटिंग हॉल बहुतेक वेळा बंद राहत असल्याने महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसह प्रवास करणाऱ्या कुटुंबांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. कोरोना काळापासून बंद असलेली पार्सल सेवा अद्याप सुरू न झाल्याने व्यापारी वर्गासह सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होत आहे. स्थानक परिसरात रेल्वे पोलीस चौकी नसल्याने चोऱ्यांच्या घटना वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्लॅटफॉर्म परिसरात दारुड्यांचा वावर वाढल्याने महि...

