अबचल नगरमध्ये हाय व्होल्टेजचा फटका; घरगुती उपकरणे जळून खाक
नागरिकांचा महावितरणविरोधात संताप
नांदेड (प्रतिनिधी) शहरातील अबचल नगर परिसरात उच्च दाबाच्या (हाय व्होल्टेज) विद्युत पुरवठ्यामुळे अनेक घरांतील महागडी विद्युत उपकरणे जळून खाक झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे संतप्त नागरिकांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महावितरण)कडे धाव घेत तातडीने पंचनामा करून नुकसानभरपाई देण्याची जोरदार मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. ४ मे रोजी रात्री सुमारे ८ वाजता सेक्टर क्रमांक १, अबचल नगर परिसरात अचानक विद्युत दाब प्रचंड वाढला. या तांत्रिक बिघाडामुळे फ्रीज, टीव्ही, एअर कंडिशनर, पंखे, बल्ब यांसारखी अनेक घरगुती उपकरणे एका क्षणात निकामी झाली. या घटनेमुळे नागरिकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
घटनेनंतरही परिसरात व्होल्टेजचे चढ-उतार सुरूच असल्याने उर्वरित उपकरणांनाही धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, या प्रकाराची माहिती महावि...
