आ. कोहोळीकर यांच्या पाठपुराव्याला यश:– हदगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाला मंजुरी
हदगाव, गौतम वाठोरे| हदगाव-हिमायतनगर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार बाबूराव कदम कोहोळीकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर मोठे यश मिळाले असून, हदगाव येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय स्थापन करण्यास राज्य मंत्रिमंडळाने ११ ऑगस्ट २०२६ रोजी अंतिम मंजुरी दिली आहे.
या निर्णयामुळे हदगाव तालुक्यातील पक्षकार, वकील आणि नागरिकांना कायदेशीर कामांसाठी नांदेड येथे जाण्याची आवश्यकता राहणार नाही. परिणामी, वकिलांसह पक्षकारांचा वेळ, प्रवासाचा खर्च आणि आर्थिक भुर्दंडात मोठी बचत होणार असून नागरिकांची होणारी गैरसोय दूर होणार आहे.
आंदालनाचा/पाठपुराव्याचा प्रवास
या महत्त्वाच्या न्यायालयासाठी आमदार बाबूराव कदम कोहोळीकर यांनी स्थानिक वकील संघटनेच्या सहकार्याने विधी व न्याय विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. शासनाने न्यायालयासोबतच सरकारी वकील कार्यालयासाठी आवश्यक न्यायिक अधिकारी, कर्मचारी पदनिर्मित...
