हदगावच्या राजकारणात ‘दिल्ली वारी’ची चर्चा; नगरसेवक अजय सूर्यवंशी यांनी घेतली खा. अशोक चव्हाणांची भेट
विकासकामांच्या बहाण्याने राजकीय समीकरणे जुळवण्याचे प्रयत्न --- स्थानिक राजकारणात खळबळ
हदगांव, गौतम वाठोरे| हदगावच्या स्थानिक राजकारणात सध्या 'सत्तेपेक्षा सलोख्याच्या राजकारणा'ची एक नवी व्याख्या पाहायला मिळत आहे. काँग्रेसचे नगरसेवक अजय सूर्यवंशी यांनी थेट देश राजधानी गाठत राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीमुळे हदगावच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, आगामी काळात मोठ्या राजकीय फेरबदलाचे संकेत मिळत आहेत. ही भेट विकासाचा अजेंडा की राजकीय लॉबिंग असा प्रश्न सर्व सामान्यात पडला आहे.
शहरातील रखडलेल्या विकासकामांच्या नावाखाली ही भेट झाली असली, तरी राजकीय विश्लेषकांच्या मते ही केवळ औपचारिक भेट नव्हती.माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भाजपमध्ये बडे नेते आहेत त्यांनी नांदेड महानगरपालिकेवर पहिल्यांदाच 'कमळ' फुलले आहे. चव्हाणांच...
