Tag: हजरत सांगडे सुलतान

हजरत सांगडे सुलतान यांच्या ५९२व्या उर्साला भक्तिमय वातावरणात प्रारंभ

हजरत सांगडे सुलतान यांच्या ५९२व्या उर्साला भक्तिमय वातावरणात प्रारंभ

धर्म अध्यात्म
संदल मिरवणुकीत विविध धर्मीय भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग; कंधारमध्ये श्रद्धेचा जनसागर कंधार, सचिन मोरे| हिंदू-मुस्लिम ऐक्य आणि सर्वधर्मसमभावाची परंपरा जपणाऱ्या कंधार शहरातील प्रसिद्ध सुफीसंत हजरत सय्यद शाह शेख अली सांगडे सुलतान मुष्किले आसान यांच्या ५९२व्या उर्साला गुरुवारी उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. उर्सानिमित्त काढण्यात आलेल्या संदल मिरवणुकीत विविध धर्मांतील हजारो भाविकांनी सहभागी होत श्रद्धासुमने अर्पण केली. साधुसंतांची भूमी म्हणून कंधार शहराची महाराष्ट्रासह इतर राज्यांतही ओळख आहे. या शहराला लाभलेल्या संतपरंपरेचा प्रत्यय हजरत सांगडे सुलतान यांच्या उर्सातही पाहायला मिळतो. विविध जाती-धर्मांचे भाविक या उर्साला श्रद्धेने उपस्थित राहतात. यावर्षीही हजारो भाविकांनी दर्ग्यावर हजेरी लावत दर्शन घेतले. सायंकाळी असरच्या नमाजानंतर साडेपाच वाजता फातेहाखानी पार पडली. त्यानंतर सज्जादानशीन...
error: Content is protected !!