Tag: ‘स्वच्छता हीच खरी संस्कृती’चा संदेश

पतंजली योग परिवाराचे नाईक नगर उद्यानात स्वच्छता अभियान; ‘स्वच्छता हीच खरी संस्कृती’चा संदेश

पतंजली योग परिवाराचे नाईक नगर उद्यानात स्वच्छता अभियान; ‘स्वच्छता हीच खरी संस्कृती’चा संदेश

सामाजिक
नांदेड | सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे, हा संदेश देत पतंजली योग परिवाराच्या वतीने नांदेड शहरातील नाईक नगर परिसरातील उद्यानात विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या उपक्रमात उद्यान परिसरातील प्लास्टिक कचरा, रिकाम्या पाण्याच्या बाटल्या, स्नॅक्स व गुटख्याची पाकिटे, खराब चप्पल, कपड्यांचे तुकडे तसेच अन्य टाकाऊ वस्तू गोळा करून त्यांची घंटागाडीमार्फत योग्य विल्हेवाट लावण्यात आली. नाईक नगर परिसरातील हे उद्यान ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक-युवती आणि लहान मुलांसाठी फिरणे, व्यायाम करणे तसेच उद्यानातील मंदिरात दर्शनासाठी महत्त्वाचे ठिकाण आहे. मात्र काही नागरिकांकडून निष्काळजीपणे कचरा टाकला जात असल्याने परिसर अस्वच्छ होत असल्याची खंत यावेळी व्यक्त करण्यात आली. यावेळी पतंजली योग समितीचे राज्य प्रभारी अनिल अमृतवार म्हणाले, "दुसऱ्याने टाकलेला कचरा उचलणे ...
error: Content is protected !!