Tag: सोयाबीन पिकासाठी ८८४.७२ कोटीं

प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत सोयाबीन पिकासाठी ८८४.७२ कोटींची नुकसानभरपाई मंजूर ; ४९९.६० कोटी वितरित

प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत सोयाबीन पिकासाठी ८८४.७२ कोटींची नुकसानभरपाई मंजूर ; ४९९.६० कोटी वितरित

शेती
नांदेड| प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY) अंतर्गत खरीप हंगाम 2025-26 मध्ये सोयाबीन पिकाच्या नुकसानीसाठी नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकूण ८८४.७२ कोटी रुपयांची नुकसानभरपाई मंजूर करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व ९३ महसूल मंडळे पात्र ठरली असून ६ लाख ३४ हजार ६२३ शेतकरी अर्जदारांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. सुमारे ४ लाख ४४ हजार ८७९.३७ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित करण्यात आले होते. दि. ७ मे २०२६ पर्यंतच्या अहवालानुसार सोयाबीन पिकासाठी निश्चित करण्यात आलेल्या ८८४.७२ कोटी रुपयांपैकी ४९९.६० कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित करण्यात आले असून ३८५.११ कोटी रुपये अद्याप प्रलंबित आहेत. विमा कंपनीच्या अद्ययावत माहितीनुसार सोयाबीन, मुग, उडीद, तूर आणि खरीप ज्वारी या पिकांसाठी मंजूर नुकसानभरपाईची एकूण रक्कम ८८८.६७ कोटी रुपये आहे. त्यापैकी ५०२ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले असून...
error: Content is protected !!