सोनारी फाट्यावरील टोलनाक्यावर सुविधांचा अभाव; भेगाळलेल्या रस्त्यावर वसुली सुरू असल्याने संताप
पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, शौचालय कुलूपबंद; नियम धाब्यावर बसवून टोलवसुलीचा आरोप
हिमायतनगर | हिमायतनगर–भोकर मार्गावरील सोनारी फाट्याजवळ सुरू करण्यात आलेल्या टोलनाक्यावर मूलभूत सुविधांचा गंभीर अभाव असल्याने प्रवासी व वाहनधारकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. विशेष म्हणजे, रस्त्याची दयनीय अवस्था असतानाही टोलवसुली मात्र जोमाने सुरू असल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, टोलनाक्यावर पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था नाही, तर शौचालयाला कुलूप लावलेले असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. याशिवाय, भोकर–हिमायतनगर अंतर्गत सिमेंट रस्त्यावर जागोजागी भेगा व खड्डे पडले असूनही टोल आकारला जात असल्याचा आरोप होत आहे.
“रस्ता खराब, सुविधा गायब... मग टोल कशासाठी?”
नागरिकांचा सवाल आहे की, रस्त्याची दुरवस्था, पाणीटंचाई, शौचालय सुविधा बं...
