Tag: सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांकडूनही कौतुक

प्रवाशांना अडचणीच्या वेळी दिली तत्पर मदत; सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांकडूनही कौतुक

प्रवाशांना अडचणीच्या वेळी दिली तत्पर मदत; सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांकडूनही कौतुक

सामाजिक
नांदेड| प्रवाशांना केवळ त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचविणे एवढेच नव्हे, तर अडचणीच्या प्रसंगी माणुसकीच्या भावनेतून मदतीचा हात पुढे करणे, हेही महाराष्ट्राच्या एसटी सेवेचे वैशिष्ट्य आहे. याची प्रचिती शुक्रवारी सकाळी नांदेड–देगलूर मार्गावर आली. ट्रॅव्हल्स बस खराब झाल्यामुळे रस्त्यावर ताटकळत उभ्या असलेल्या पंजाबमधील सुमारे ३० महिला प्रवाशांना ‘शिवाई’ बसच्या चालक, वाहक आणि वाहतूक नियंत्रकांनी तत्परतेने मदत करून सुखद अनुभव दिला. शुक्रवार, २१ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास पंजाब येथील सुमारे ३० महिला प्रवासी प्रवास करत असलेल्या ट्रॅव्हल्समध्ये अचानक बिघाड झाला. वाहन रस्त्यातच बंद पडल्याने महिला प्रवाशांना बराच वेळ अडचणींचा सामना करावा लागत होता. अनोळखी ठिकाणी, वाहनाची सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांच्या चिंतेत भर पडली होती. याचवेळी नांदेड–देगलूर मार्गावर धावणाऱ्या ‘शिवाई’ बसचे चालक राजे...
error: Content is protected !!