सुनील मोरे शिक्षक आत्महत्या प्रकरणात प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना सहआरोपी करा
शिक्षण संचालक, उपसंचालक आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे प्रकाश मारावार यांची मागणी
नांदेड, प्रतिनिधी| नांदेड जिल्ह्यात गाजत असलेल्या शिक्षक सुनील मोरे आत्महत्या प्रकरणात प्राथमिक शिक्षणाधिकारी फुटाणे यांना सहआरोपी करून तातडीने निलंबित करावे, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे स्थानिक नेते प्रकाश मारावार यांनी केली आहे.
या मागणीचे निवेदन शिक्षण संचालक श्री. ससाने, शिक्षण उपसंचालक श्री. मठपती आणि नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांच्याकडे देण्यात आले आहे.
नांदेड जिल्हा परिषद शिक्षण विभागातील कथित अनागोंदी कारभार आणि अधिकाऱ्यांच्या बेजबाबदार कार्यपद्धतीमुळे शिक्षकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. शिक्षक सुनील मोरे यांनी गेल्या वर्षभरापासून आपल्यावर होत असलेल्या कथित अन्यायाबाबत प्राथमिक शिक्षणाधिकारी फुटाणे यांच्याकडे वारंवार व्...
