सीमा भागातील सिमेंट रस्त्यांमध्ये मोठा घोटाळा? उच्चस्तरीय चौकशीची मागणी तीव्र
बिलोली (गोविंद मुंडकर) बिलोली तालुक्यातील सीमा भागात सुरू असलेल्या सिमेंट रस्त्यांच्या कामांबाबत गंभीर अनियमितता उघडकीस येत असून, आता या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. ग्रामस्थांच्या आरोपानुसार, अनेक गावांमध्ये रस्ते कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची होत असून, संबंधित गुत्तेदाराचे अधिक लाभासाठी दुर्लक्ष स्पष्टपणे दिसून येत आहे.. येथील अधिकारी चांगले काम करण्याचा आग्रह धरून सुद्धा त्यांचा उपयोग शून्य दिसतो आहे.
बावलगांव येथे सुरू असलेल्या कामामध्ये निकृष्ट दर्जाचे सिमेंट वापरले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. स्थानिकांनी याचे चित्रीकरणही केले असून, संबंधित पुरावे उपलब्ध असतानाही प्रशासनाने अद्याप ठोस कारवाई केली नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. येसगी येथील कामाबाबत लवकरच बैठक घेण्यात येणार आहे.
कार्ला (बु.) येथे तर परिस्थिती अधिक गंभीर असल्याचे समोर आले...
