नांदेड रेल्वे विभागात पाणी गुणवत्तेवर कडक नजर; सात महिन्यांत १,०२९ नमुन्यांची जैविक तपासणी
२२ हजारांहून अधिक अवशिष्ट क्लोरीन तपासण्या; एकाही पाणी नमुन्यात असमाधानकारक गुणवत्ता आढळली नाही
नांदेड | प्रवासी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांना सुरक्षित व स्वच्छ पिण्याचे पाणी तसेच स्वच्छतापूर्ण खाद्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाकडून पाणी गुणवत्ता तपासणीची यंत्रणा अधिक सक्षम करण्यात आली आहे. कॅग अहवालातील निरीक्षणांमध्ये नांदेड विभागातील कोणत्याही रेल्वे स्थानकावर दूषित पाणी आढळल्याचे नमूद नसल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
नांदेड विभागातील विविध रेल्वे स्थानके आणि रेल्वे वसाहतींमध्ये ९ आरोग्य निरीक्षकांचे समर्पित पथक कार्यरत असून, रेल्वे वैद्यकीय विभागाच्या मार्गदर्शनाखाली पाणी गुणवत्ता आणि खाद्यपदार्थांच्या स्वच्छतेची नियमित पाहणी केली जाते.
सात महिन्यांत हजारो नमुन्यांची तपासणी - पाणी गुणवत्तेच्या नियमित निरीक्षणाअंतर्गत पाण्याचे नमुने घेऊन ...
