सहस्रकुंड बाणगंगा येथे भव्य शिवपुराण कथा महोत्सव; २९ जूनपासून भक्तिमय पर्वाला सुरुवात
परमपूज्य बालयोगी गजेंद्र स्वामी महाराज यांच्या श्रीमुखातून भगवान महादेवांच्या दिव्य महिमेचे वर्णन
हिमायतनगर, अनिल मादसवार| किनवट -हिमायतनगर तालुक्याच्या मध्यभागी असलेल्या प्रसिद्ध सहस्रकुंड बाणगंगा महादेव मंदिर देवस्थान येथे येत्या 29 जून ते 5 जुलै 2026 या कालावधीत भव्य संगीतमय शिवपुराण कथा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. परमपूज्य बालयोगी गजेंद्र स्वामी महाराज यांच्या श्रीमुखातून भगवान महादेवांच्या दिव्य महिमेचे रसाळ व भक्तिमय निरूपण होणार असल्याने परिसरात धार्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दिनांक 29 जून ते 5 जुलै 2026 या कालावधीत भव्य संगीतमय शिवपुराण कथा दररोज दुपारी १ ते ४ वाजेपर्यंत परमपूज्य बालयोगी गजेंद्र स्वामी महाराज यांच्या चालणार असून, कथेनंतर दररोज महाप्रसाद वितरण होईल. दिनांक 6 जुलै रोजी काल्याच कीर्तन होऊन भव्य महाप्रसादाने कथा महोत्सवाचा समारोप होणार आहे. भगवान श...
