सर्वाह व्हेंचर डेव्हलपमेंट प्रोग्राम २०२६ चे अंतिम निकाल जाहीर; सर्वाह फाउंडेशन दिनानिमित्त १० संघांची अंतिम निवड
नवीन नांदेड| सर्वाह इन्क्युबेशन फाउंडेशन आणि श्री गुरु गोबिंद सिंघजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्था (एस.जी.जी.एस. आय.ई.अँड टी.), नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वाहच्या तिसऱ्या स्थापना दिनानिमित्त आयोजित सर्वाह “व्हेंचर डेव्हलपमेंट प्रोग्राम (VDP) २०२६” अंतर्गत अंतिम फेरीतील स्टार्टअप संघांची घोषणा करण्यात आली. एस.जी.जी.एस.आय.ई. अँड टी. नांदेड च्या माजी विद्यार्थ्यांच्या (Alumni) सहकार्याने राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून संस्थेमध्ये “नवोपक्रम, उद्योजकता आणि स्टार्टअप” संस्कृतीला चालना देण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले.
या कार्यक्रमास एस.जी.जी. एस. आय.ई. अँड टी. च्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचे अध्यक्ष श्री. प्रशांत पौळ तसेच बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचे सदस्य व संस्थेचे माजी विद्यार्थी अमोल महामुनी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी सर्वाह इन्क्युबेशन फाउंडेशनचे अध्यक्ष व सं...
