Tag: सरिता जडलावार

सरिता जडलावार यांना उपक्रमशील व गुणवंत शिक्षिका पुरस्काराने सन्मानित

सरिता जडलावार यांना उपक्रमशील व गुणवंत शिक्षिका पुरस्काराने सन्मानित

करियर
शैक्षणिक उपक्रमांतून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी योगदान; शिक्षक दिनानिमित्त देगलूर येथे गौरव देगलूर /शहापूर (प्रतिनिधी) ‘शिक्षण ही केवळ नोकरी नसून समाजाच्या सर्वांगीण विकासाचा आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याचा पाया मजबूत करण्याचे प्रभावी माध्यम आहे’ हा विचार उराशी बाळगून शिक्षण क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या शहापूर येथील पीएम श्री शाळेच्या शिक्षिका सरिता जडलावार यांना ‘उपक्रमशील व गुणवंत शिक्षिका पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले. शिक्षक दिनाचे औचित्य साधून डॉ. राधाकृष्णन मेमोरियल ट्रस्ट, देगलूर यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात हा गौरव करण्यात आला. आमदार तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तुषार राठोड, आमदार जितेश अंतापूरकर आणि जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा मीनलताई खतगावकर यांच्या हस्ते सरिता जडलावार यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. सरिता जडलावार यांन...
error: Content is protected !!