Tag: समाज जागा झाला पाहिजे!

आत्महत्येनंतर नव्हे, आत्महत्या होण्यापूर्वी समाज जागा झाला पाहिजे!

आत्महत्येनंतर नव्हे, आत्महत्या होण्यापूर्वी समाज जागा झाला पाहिजे!

लेख
नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चालला आहे. प्रत्येक आत्महत्येनंतर अश्रू ढाळले जातात, संवेदना व्यक्त केल्या जातात, आर्थिक मदतीच्या घोषणा होतात, अधिकारी धाव घेतात, राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी होतात आणि माध्यमांमध्ये अनेक दिवस चर्चा रंगते. परंतु एक मूलभूत प्रश्न मात्र प्रत्येक वेळी अनुत्तरित राहतो—हे सर्व त्या व्यक्तीने जगण्याचा निर्णय घेतला असता, त्याआधी का घडत नाही? आज आत्महत्येनंतर मदतीची व्यवस्था निर्माण झाली आहे; पण आत्महत्या होऊच नये यासाठीची यंत्रणा अजूनही तितकी प्रभावी दिसत नाही. हीच आपल्या समाजाची आणि व्यवस्थेची सर्वात मोठी शोकांतिका आहे. आत्महत्या ही केवळ एका व्यक्तीचा मृत्यू नसतो. तो एका कुटुंबाचा आधार हरवण्याचा क्षण असतो. एका घरातील मुलांचे भविष्य अंधारात लोटणारी घटना असते. वृद्ध आई-वडिलांच्या उरात कायमची वेदना निर्माण करणार...
error: Content is protected !!