समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांमुळे सामाजिक न्यायाची संकल्पना: नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन
नांदेड,गोविंद मुंडकर| सामाजिक न्याय ही केवळ शासनाची घोषणा नसून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकासाच्या संधी पोहोचविण्याची व्यापक चळवळ आहे. या उद्देशाने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती, महिला, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, तृतीयपंथीय, ऊसतोड कामगार तसेच आर्थिक व सामाजिकदृष्ट्या वंचित घटकांसाठी विविध कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविण्यात येत असून, हजारो नागरिक या योजनांचा लाभ घेत आहेत, अशी माहिती ज्येष्ठ निरीक्षिका तथा प्रभारी कार्यालयीन अधीक्षिका माधुरी राठोड यांनी दिली.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, नांदेड येथे झालेल्या कार्यालयीन भेटीदरम्यान त्यांनी विभागाच्या कार्यपद्धती, विविध योजना आणि शासनाच्या लोकाभिमुख उपक्रमांविषयी सविस्तर माहिती दिली. सामाजिक न्याय विभाग हा केवळ शासकीय कार्यालय नसून समाजातील दुर्बल घटकांना सक्षम, स्वाभिमानी आणि आत्मनिर्भर...
