संस्कार आणि संस्कृती जपणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गौरव; पंढरपूर पायी वारीसाठी विजय चव्हाण यांचा सत्कार
नांदेड | भारतीय संस्कृती, वारकरी परंपरा आणि मूल्याधिष्ठित शिक्षणाचा संदेश देणारा प्रेरणादायी उपक्रम गुजराती हायस्कूल, नांदेड येथे पार पडला. आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर पायी वारीसाठी प्रस्थान करणारे शाळेचे वरिष्ठ लिपिक विजय चव्हाण यांचा शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
यावेळी मुख्याध्यापक आर. एस. सुमठाणकर यांनी भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि संस्कारांचे महत्त्व अधोरेखित करत शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्ये रुजविणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. शिक्षक व कर्मचारी स्वतःच्या आचरणातून संस्कृतीचे संवाहक बनले, तर विद्यार्थ्यांमध्येही चांगले संस्कार आपोआप रुजतात, असे ते म्हणाले.
शिक्षण हे केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित नसून सामाजिक बांधिलकी, परंपरा आणि अध्यात्म यांची जोपासना देखील तितकीच महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले. अशा विधायक उपक्रमांमध्ये सह...
