श्रावणात परमेश्वर मंदिरात भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासन सज्ज
दर्शन, वाहतूक, पार्किंग, स्वच्छता व सुरक्षेच्या सुविधांचा तहसीलदार पल्लवी टेमकर यांनी घेतला आढावा
हिमायतनगर, प्रतिनिधी | हिमायतनगर येथील जागृत देवस्थान श्री परमेश्वर मंदिरात श्रावण महिन्यानिमित्त दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये, यासाठी सुलभ दर्शन व्यवस्था, वाहतूक नियोजन, स्वच्छता, सुरक्षा आणि इतर मूलभूत सुविधांचा आढावा घेण्यासाठी सोमवार, दि. ११ ऑगस्ट रोजी मंदिर समितीची आढावा बैठक घेण्यात आली.
श्री परमेश्वर मंदिर समितीच्या पदसिद्ध अध्यक्षा तथा तहसीलदार सौ. पल्लवी टेमकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस मंदिर समितीचे उपाध्यक्ष महावीरसेठ श्रीश्रीमाळ, सचिव अनंता देवकते, पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे, नगरपंचायत मुख्याधिकारी समाधान मासाळ, बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी श्री. दुबे यांच्यासह मंदिर समितीचे संचालक, विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी...
