Tag: शेतकऱ्यांसाठी ६०% डिझेल राखीव ठेवण्याची मागणी

डिझेल टंचाईवर आमदार कोहळीकरांचा इशारा; शेतकऱ्यांसाठी ६०% डिझेल राखीव ठेवण्याची मागणी

डिझेल टंचाईवर आमदार कोहळीकरांचा इशारा; शेतकऱ्यांसाठी ६०% डिझेल राखीव ठेवण्याची मागणी

राजकारण
खरीप हंगाम तोंडावर, पंपांवरील गैरव्यवस्थेविरोधात प्रशासनाला सज्ज राहण्याचे आवाहन नांदेड/हदगाव/हिमायतनगर, अनिल मादसवार| खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना वेळेवर डिझेल उपलब्ध होत नसल्याने निर्माण झालेल्या अडचणींवर आता राजकीय पातळीवरही आवाज उठू लागला आहे. हदगाव - हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबुराव कदम-कोहळीकर यांनी नांदेड जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवरील एकूण डिझेल साठ्यापैकी ६० टक्के साठा शेतकरी व कृषी उपयोगासाठी राखीव ठेवण्याची मागणी केली आहे. सध्या शेतीची मशागत, पेरणीपूर्व कामे आणि सिंचनासाठी ट्रॅक्टर, पंप व इतर कृषी यंत्रसामग्रीचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. मात्र, ऐन हंगामात अनेक पेट्रोल पंपांवर शेतकऱ्यांना डिझेलसाठी ताटकळत उभे राहावे लागत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. यामुळे शेतीची कामे रखडत असून शेतकऱ्यांना आर्थिक व मानसिक फटका बसत अस...
error: Content is protected !!