Tag: शेतकऱ्यांची फसवणूक

हिमायतनगरात खत टंचाई की काळाबाजार?; शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचा गंभीर आरोप

हिमायतनगरात खत टंचाई की काळाबाजार?; शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचा गंभीर आरोप

शेती, राजकारण
स्टॉक असूनही “खत संपले”चा फलक; कृषी विभागाच्या भूमिकेवर वडगांवकर यांनी उपस्थित केला प्रश्नचिन्ह हिमायतनगर, अनिल मादसवार| खरीप हंगाम तोंडावर असताना हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांना खतासाठी वणवण भटकावे लागत असून, काही कृषी सेवा केंद्रांकडून खत साठा लपवून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात असल्याचा गंभीर आरोप वामनराव पाटील वडगांवकर यांनी केला आहे. काही दुकानदारांनी दुकानाच्या नावावरील खताचा स्टॉक मित्र, नातेवाईक व इतर व्यक्तींच्या आधार कार्डवर OTP घेऊन ‘स्कॅन’ करून उडवण्याचा प्रकार सुरू केला असल्याची चर्चा शेतकरी बांधवांत रंगू लागली आहे. स्थानिक शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हिमायतनगर शहरातील अनेक कृषी दुकानांमध्ये शेतकरी खत मागण्यासाठी गेल्यास “स्टॉक संपला” असे सांगितले जाते. मात्र, शहर व ग्रामीण परिसरातील काही खासगी गोडाऊनमध्ये DAP, युरिया, 10:26:26 आणि पोटॅश खतांचा मोठ्या प्रमाणावर साठा असल्...
error: Content is protected !!