Tag: शेतकरी चातकाप्रमाणे आभाळाकडे

मृग नक्षत्र उलटले, तरी पावसाचा पत्ता नाही; शेतकरी चातकाप्रमाणे आभाळाकडे

मृग नक्षत्र उलटले, तरी पावसाचा पत्ता नाही; शेतकरी चातकाप्रमाणे आभाळाकडे

शेती
पेरणीची कामे रखडली : शेतकरी चिंतेत पाणीपातळी खालावण्यास सुरुवात : पशू-पक्ष्यांनाही फटका आभाळात ढगांची गर्दी, पण वरुणराजाची प्रतीक्षा अद्याप कायम हिमायतनगर/नांदेड, अनिल मादसवार| मृग नक्षत्र लागून तब्बल १५ दिवस उलटले तरी नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्यात समाधानकारक पावसाची प्रतीक्षा कायम आहे. पावसाअभावी शेतकरी चिंतेत असून पेरणीची कामे खोळंबली आहेत. त्यामुळे शेतकरी वर्ग चातकाप्रमाणे आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. रविवार (दि. २१) पासून वातावरणात काहीसा बदल जाणवू लागला आहे. काही भागांत थंड तर काही ठिकाणी उष्ण वारे वाहत असून आकाशात पावसाळी ढगांची गर्दी दिसत आहे. सायंकाळच्या वेळी आभाळ दाटून येत असले तरी अद्यापही पावसाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे "केव्हा बरसणार वरुणराजा?" हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी वर्गाला सतावत आहे. यंदाच्या खरीप हंगामासाठी अनेक शेतकऱ्यांनी शेताची मशागत पूर्ण करून...
error: Content is protected !!