Tag: शिवसेनेत (शिंदे गट) दाखल

भाजपाला धक्का; संग्राम हयगले एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत (शिंदे गट) दाखल

भाजपाला धक्का; संग्राम हयगले एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत (शिंदे गट) दाखल

राजकारण
बिलोली,गोविंद मुंडकर | बिलोली तालुक्यातील कासराळी येथील माजी जिल्हा परिषद सदस्य संग्राम हयगले यांनी भाजपाला रामराम ठोकत शिवसेना एकनाथ शिंदे गट (Shiv Sena Eknath Shinde faction) मध्ये प्रवेश केला. २७ एप्रिल २०२६ रोजी ठाणे येथील स्व. मातोश्री गंगुबाई शिंदे सभागृहात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. या घडामोडीमुळे बिलोली तालुक्यात भाजपाला मोठा धक्का बसल्याची चर्चा सुरू झाली आहे. संग्राम हयगले हे शांत स्वभाव, कार्यतत्परता आणि लोकाभिमुख नेतृत्वासाठी ओळखले जातात. भाजपात कार्यरत असताना त्यांनी दोन वेळा जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून येत ग्रामीण भागात विकासकामांचा ठसा उमटवला होता. रस्ते, पाणीपुरवठा, शाळांची दुरुस्ती, अंगणवाडी सुविधा तसेच शेतकरी कल्याणाशी संबंधित अनेक उपक्रम त्यांनी राबवले होते. मात्र, पक्षांतर्गत मतभेद आणि गटबाजीमुळे नाराज झाले...
error: Content is protected !!