२७ मे रोजी धडक ठिय्या आंदोलन; “शासनाचा पगार घेता, मग मुख्यालयी राहायला लाज वाटते का?”
हिमायतनगरमधील ‘मुजोर’ अधिकारी-कर्मचाऱ्यांविरोधात २७ मे रोजी धडक ठिय्या आंदोलन; हलगी वाजवत केला जाणार निषेध
हिमायतनगर,अनिल मादसवार | तालुक्यातील विविध शासकीय विभागांतील अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी न राहता बाहेरून ये-जा करत असल्याने सामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांची कामे रखडत असल्याचा संतापजनक आरोप पुढे आला आहे. या कथित निष्काळजी, मुजोर व सुस्त प्रशासनाविरोधात बुधवार, दि. २७ रोजी हिमायतनगर तहसील कार्यालयावर “धडक ठिय्या व हलगी बजाव स्वागत आंदोलन” छेडण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते राजूभाऊ गायकवाड यांनी दिली.
“शासनाचा लाखोंचा पगार आणि घरभाडे भत्ता घेतात, मग मुख्यालयी राहायला लाज वाटते का?” असा संतप्त सवाल उपस्थित करत आंदोलनकर्त्यांनी प्रशासनावर जोरदार निशाणा साधला आहे. तालुक्यातील अनेक अधिकारी व कर्मचारी नांदेडसह इतर शहरांतून आरामशीर ये-जा करत असल्याने कार्यालये वेळेवर सुरू हो...
