शासकीय कार्यक्रमात जखमी दिव्यांग युवकाला महिनाभरानंतरही मदत नाही; जिल्हाधिकाऱ्यांना अंतिम स्मरणपत्र
आर्थिक मदत, उपचार खर्च व पुनर्वसनाची मागणी; भविष्यात शासकीय कार्यक्रमांत दिव्यांगांसाठी सुरक्षिततेची व्यवस्था अनिवार्य करण्याची मागणी
नांदेड, प्रतिनिधी| दि. 26 जून 2026 रोजी नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे आयोजित शासकीय कार्यक्रमादरम्यान गंभीर जखमी झालेल्या दिव्यांग युवक कार्तिक कुमार भरतीपूरम यांना घटनेनंतर तब्बल एक महिना उलटूनही कोणतीही आर्थिक मदत, उपचार खर्चाची भरपाई अथवा पुनर्वसनाबाबत ठोस मदत मिळाली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे तातडीने पाठपुरावा करावा, या मागणीसाठी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे अंतिम स्मरणपत्र सादर करण्यात आले.
या प्रकरणी यापूर्वीही प्रशासनाकडे निवेदने देण्यात आली असून राज्य मानवाधिकार आयोगाकडेही तक्रार दाखल करण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. जखमी दिव्यांग युवकाला उपलब्ध शासकीय योजनांमधून किंवा ...

