दुर्गावाहिनी शौर्य प्रशिक्षणादरम्यान हिमायतनगर शहरात भव्य शोभायात्रा; राष्ट्रभक्तीचा जागर
शौर्य, संस्कार आणि राष्ट्रसेवेचे प्रेरणादायी प्रात्यक्षिक
हिमायतनगर, अनिल मादसवार | विश्व हिंदू परिषद देवगिरी प्रांत आयोजित दुर्गावाहिनी शौर्य प्रशिक्षण वर्गाच्या निमित्ताने शहरातील प्रमुख मार्गांवरून गुरुवार दिनांक 14 च्या रात्री भव्य शोभायात्रा काढण्यात आली. उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या शोभायात्रेत सहभागी युवतींनी विविध शौर्य प्रात्यक्षिके सादर करत नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.
शहरात भगवे ध्वज, घोषणाबाजी आणि पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या दुर्गावाहिनीच्या युवतींमुळे परिसरात राष्ट्रभक्ती आणि संस्कारमय वातावरण निर्माण झाले होते. आत्मसंरक्षण, शिस्त, संघटन आणि राष्ट्रसेवेचा संदेश देणाऱ्या या शोभायात्रेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
दुर्गावाहिनीच्या माध्यमातून राष्ट्रभक्त, संस्कारित आणि स्वाभिमानी युवती घडविण्याचे महत्त्व या शोभायात्रेतून अधोरेखित करण्यात आले. प्रशिक्षण...
