गुटखा, अंमली पदार्थ व शस्त्रविरोधी मोहिमेत 131 गुन्हे दाखल
नांदेड परिक्षेत्रात पोलिसांची मोठी कारवाई; 94 लाखांचा मुद्देमाल जप्त
नांदेड | सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर नांदेड परिक्षेत्रात पोलिसांनी अवैध धंद्यांवर मोठा प्रहार करत गुटखा, अंमली पदार्थ आणि घातक शस्त्रांविरोधात विशेष मोहीम राबवली. या मोहिमेत तब्बल 131 गुन्हे दाखल करण्यात आले असून, सुमारे 94 लाख 13 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली 11 ते 25 एप्रिल 2026 या कालावधीत ही धडक मोहीम राबवण्यात आली. नांदेड, परभणी, हिंगोली आणि लातूर जिल्ह्यातील पोलीस यंत्रणांनी संयुक्तरीत्या या कारवायांमध्ये सहभाग घेतला. यात गुटखा प्रकरणे : 34 गुन्हे, अंमली पदार्थ प्रकरणे : 5 गुन्हे, शस्त्र कायदा प्रकरणे : 92 गुन्हे असे एकूण गुन्हे : 131 दाखल करण्यात आले असून, यात गुटखा व इतर साहित्य : ₹57,48,753, गांजा व वाहन : ₹15,87,450, घातक शस्त्रे (पिस्टल...
