Tag: शब्दपूर्तीचा मान

आ. बाबूराव कदम कोहळीकरांचा शब्दपूर्तीचा मान; हरडफ–देवसरी रस्त्यासाठी ५० लाखांचा निधी मंजूर

आ. बाबूराव कदम कोहळीकरांचा शब्दपूर्तीचा मान; हरडफ–देवसरी रस्त्यासाठी ५० लाखांचा निधी मंजूर

राजकारण
हदगाव, गौतम वाठोरे| हदगाव–हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबूराव कदम कोहळीकर यांनी दिलेला शब्द पाळत हरडफ–देवसरी या महत्त्वाच्या रस्त्यासाठी तब्बल ५० लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून कामालाही प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. या निर्णयामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. या रस्त्याच्या मंजुरीसाठी युवानेते शरद कदम यांनी सातत्याने पाठपुरावा केला. गावातील रस्त्याची दुरवस्था, नागरिकांची गैरसोय याकडे त्यांनी वारंवार आमदारांचे लक्ष वेधले होते. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून विकासकामांना गती मिळाली आहे. हरडफ ते देवसरी हा रस्ता विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणारा महत्त्वाचा दुवा मानला जातो. या रस्त्यामुळे दोन्ही विभागांतील नागरिकांना दळणवळणाची मोठी सोय उपलब्ध होणार आहे. केवळ निधी मंजूर करून न थांबता, आमदारांनी काम तातडीने सुरू करण्याचे आदेश दिले असून सध्या काम युद्धपातळ...
error: Content is protected !!