खत काळाबाजार उघड करणाऱ्याला जीवे मारण्याच्या धमक्या?; हिमायतनगरात संताप
शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा सुरूच राहणार; “धमक्यांना भीक घालणार नाही” वामनराव पाटील वडगांवकर
हिमायतनगर, अनिल मादसवार| तालुक्यातील खत टंचाई, काळाबाजार आणि शेतकऱ्यांच्या लुटीचा मुद्दा ऐरणीवर असतानाच हिमायतनगरातील काही कृषी दुकानदार व दलालांकडून धमकीचे राजकारण सुरू झाल्याचा गंभीर आरोप समोर करण्यात आला आहे. खताचे पार्सल बाहेर जात असल्याचे फोटो काढल्याच्या कारणावरून काही दलालांकडून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा दावा करण्यात आला असून, अशी पोस्ट सोशल मीडियावर वामनराव पाटील वडगांवकर यांनी व्हायरल केली आहे.
याप्रकरणी शेतकरी हितासाठी आवाज उठवणाऱ्यांनी स्पष्ट भूमिका घेत, “शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सुरू केलेला लढा कोणत्याही धमकीला घाबरणारा नाही,” असा इशारा दिला आहे. खताचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून किंवा काळाबाजाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांची आर्थिक लूट करणाऱ्यांनी “आपल्या औकातीत राहा...
