हदगाव बस स्थानकात भीषण अपघात; एसटी बसची धडक लागून वृद्ध शेतकऱ्याचा जागीच मृत्यू
हदगाव, गौतम वाठोरे| हदगाव शहरातील बस स्थानकात सोमवारी दुपारी घडलेल्या भीषण अपघातात एसटी बसच्या चाकाखाली सापडून एका ७० वर्षीय वृद्ध शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. उत्तम आबाजी वाघमारे (वय ७०, रा. पेवा, ता. हदगाव) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तम वाघमारे हे आपल्या गावाकडे जाण्यासाठी हदगाव बस स्थानकात आले होते. यावेळी भंडारा–औसा एसटी बस (क्रमांक MH 14 MH 2740) स्थानकात प्रवेश करत असताना, ते बसच्या मागील चाकाखाली आल्याने गंभीर अपघात झाला. या भीषण घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच हदगाव पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हदगाव उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. संबंधित एसटी बस हदगाव पोली...
