‘विश्वकाव्याचा संस्कृती उत्सव’ काव्यसंग्रहाचे मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते प्रकाशन
डॉ. पृथ्वीराज तौर यांच्या अनुवादित संग्रहात २५ देशांतील ३१ कवींच्या कवितांचा समावेश
नांदेड | स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉ. पृथ्वीराज तौर यांनी अनुवादित केलेल्या ‘विश्वकाव्याचा संस्कृती उत्सव’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन महाराष्ट्राचे मराठी भाषा व उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवनात आयोजित ‘नांदेड जिल्ह्यातील साहित्यिकांशी संवाद’ कार्यक्रमात करण्यात आले.
यावेळी आमदार बालाजी कल्याणकर, बाबुराव कोहळीकर, आनंदराव बोंढारकर, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. श्यामकांत देवरे, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. रत्नदीप गायकवाड, ज्येष्ठ नाटककार दत्ता भगत, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते श्रीकांत देशमुख, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अ...
