विद्यार्थ्यांच्या सुरक्षित आणि उज्ज्वल भविष्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वंकष उपाययोजना राबवणार- जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी समितीची बैठक संपन्न
नांदेड| नांदेडमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षित आणि उज्ज्वल भविष्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वंकष उपाययोजना राबवणार असल्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितले. अंमली पदार्थ विरोधी समितीच्या बैठकीत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
नांदेड हे शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र बनले असून राज्यभरातून विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येतात. या विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरणात दर्जेदार शिक्षण मिळावे आणि त्यांचे भवितव्य उज्ज्वल व्हावे, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सर्वंकष उपाययोजना करण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी समितीची बैठक पार पडली.
या बैठकीस उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. आश्विनी जगताप, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सं...
