नांदेडमध्ये अवतरली पंढरी; गुजराती हायस्कूलच्या दिंडीने भाविकांना दिला विठ्ठलभक्तीचा अविस्मरणीय अनुभव
नांदेड| आषाढी वारीची भक्तिभावाने ओथंबलेली परंपरा आणि विठ्ठलनामाचा अखंड गजर सोमवारी नांदेडच्या रस्त्यांवर अक्षरशः अवतरला. गुजराती हायस्कूल, नांदेडच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य पायी दिंडीने शहरातील नागरिक आणि पालकांना साक्षात पंढरपूरच्या वारीचा दिव्य अनुभव दिला.
सकाळी सात वाजता शाळेच्या परिसरातून टाळ-मृदंग, वीणेचे सूर, अभंगांचा निनाद आणि "ज्ञानोबा-तुकाराम", "पांडुरंग हरी"च्या जयघोषात दिंडीला प्रारंभ झाला. वारकरी वेशभूषेत सजलेले विद्यार्थी-विद्यार्थिनी, डोक्यावर तुळशीवृंदावन, हातात भगव्या पताका आणि मुखी विठ्ठलनाम... हे दृश्य पाहून नांदेडकर क्षणभर पंढरपूरच्या पावन भूमीतच पोहोचल्याची अनुभूती घेत होते.
दिंडीचे शहरातील विविध ठिकाणी उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. ठिकठिकाणी पुष्पवृष्टी, आरती आणि भक्तिभावाने दिंडीचे स्वागत झाल्याने वातावरण अधिकच मंगलमय झाले. दिंडीतील पारंपरिक रिंगण सो...
